वृद्धाच्या मृत्युप्रकरणी कंटेनर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

On: June 13, 2021 8:01 PM

जळगाव : जळगाव शहरातून जाणा-या महामार्गावर अजिंठा चौफुली येथे आज सकाळी कंटेनरचालकाच्या धडकेत वृद्धाचा मृत्यू झाला. आज सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास घडलेल्या या घटनेच्या वेळी घटनास्थळावर मोठी खळबळ माजली होती. या घटनेप्रकरणी कंटेनर चालकाविरुद्ध एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यत आला आहे.

लासलगाव येथील मुळ रहिवासी असलेले रज्जाक पटेल हे त्यांच्या पुतण्याकडे जळगाव तालुक्यातील पाथरी येथे राहण्यास आले होते. त्यांना नातेवाईकाकडे नशिराबाद येथे जायचे होते. त्यामुळे ते अजिंठा चौकातील रिक्षा स्टॉपजवळ रिक्षाची वाट बघत उभे होते. त्याचवेळी भुसावळकडून जळगावच्या दिशेने आलेल्या कंटेनरने (युपी 78 सीटी 6920) त्यांना जोरदार धडक दिली. या धडकेत कंटेनरचे चाक त्यांच्या पोटावरुन गेले. त्यात ते जबर जखमी होऊन जागीच मृत्युमुखी पडले. याप्रकरणी कंटेनर चालक सुरेंद्र कुमार (कानपुर उत्तर प्रदेश) याच्याविरुद्ध एमआयडीसी पोलिस स्टेशनला रितसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास स.पो.नि. अओल मोरे व त्यांचे सहकारी रतीलाल पवार करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment