कोरोनाच्या आक्षेपार्ह पोस्ट भोवल्या;नाशिकला नेटिझन्सवर गुन्हे दाखल

नाशिक : कोरोना संक्रमण आणि लॉकडाऊन काळात जनसामान्यांपर्यंत अधिकृत शासकीय माहितीची पडताळणी न करता दिशाभूल करणारी माहिती सोशल मीडियाद्वारे प्रसारित करणे ‘नेटिझन्स’च्या अंगाशी आले आहे. पोलिसांकडून थेट फौजदारी गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे.

लॉकडाऊन काळात कधी मनपा आयुक्तांच्या नावाने, तर कधी जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने चुकीची माहिती व्हायरल करण्यात आली होती. उत्साहाच्या भरात कुठल्याही माहितीची खातरजमा न करता फेसबुक, व्हॉस्टअ‍ॅप, ट्विटरसारख्या सोशल साइट्सवर पोस्ट टाकणे काही नेटिझन्सला महागात पडले आहे.

ग्रामीण सायबर पोलिसांनी विविध पोलीस स्टेशन अंतर्गत अशाप्रकारच्या वीस लोकांविरुद्ध गुन्हे दाखल करत 37 संशयितांना अटक केली आहे.नाशिक शहर सायबर पोलिसांनी 11 संशयितांवर अशा स्वरूपाची कारवाई केली आहे. यात एकूण ८ पुरुषव १ महिलेला अटक करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here