झन्ना मन्ना पत्त्याचा पोलिसांनी उधळला डाव

On: June 14, 2021 10:14 PM

जळगाव : जे.के.पार्क नजीक मनपा स्विमींग टॅंकच्या पाठीमागे सुरु असलेला झन्ना मन्ना मांगपत्त्याचा डाव एमआयडीसी पोलिसांच्या पथकाने आज उधळून लावला. या कारवाई दरम्यान दोघांना पकडण्यात आले तर दोन जण पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत.

आज सायंकाळी आठ वाजेच्या सुमारास जे.के.पार्क समोर असलेल्या काटेरी झुडूपात रंगलेला हा पत्त्यांचा डाव उधळण्यात आला. या कारवाईत दिपक संजय हटकर (21) रा.श्रीकृष्ण नगर गवळीवाडा पाचोरा, जिभाऊ उत्तम हटकर (25) रा.गवळीवाडा तांबापुरा जळगाव यांना जागीच पकडण्यात आले. दरम्यान टिनु गोसावी आणि भिला हटकर (रा. गवळीवाडा तांबापुरा जळगाव) हे पळून जाण्यात यशस्वी झाले.

ताब्यातील व पळून गेलेल्या चौघांवर एमआयडीसी पोलिस स्टेशनला रितसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याकडून पत्त्यांचा कॅट व रोख रकमेसह एकुण 30 हजार 950 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक प्रताप शिकारे यांच्या मार्गदर्शनाखाली या कारवाईत पो.हे.कॉ. अल्ताफ पठाण, गफ्फार तडवी, सतीष गर्जे, मुकेश नेरकर, लुकमान तडवी, इमरान बेग आदींनी सहभाग घेतला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment