जळगाव : सुशिक्षीत बेरोजगार तरुणाकडून दहा हजाराची लाच घेणे जिल्हा उद्योग केंद्रातील प्रकल्प अधिका-याच्या अंगलट आले आहे. लाचेच्या दहा हजाराच्या रकमेचा स्विकार करताच एसीबीच्या पथकाने झडप घालत प्रकल्प अधिकारी आनंद देवीदास विद्यासागर यास पकडण्यात आले.
तक्रारदार हे सुशिक्षीत बेरोजगार असून त्यांनी शासनाच्या पीएमईजीपी या योजनेअंतर्गत कर्ज व सबसिडी योजनेचा लाभ मिळण्याकामी प्रकरण अपलोड केले होते. सदर प्रकरण बॅकेकडे पाठवण्याच्या मोबदल्यात प्रकल्प अधिकारी विद्यासागर याने तक्रारदाराकडे दहा हजार रुपयांची मागणी केली होती. मागणी केलेली रक्कम आज पंचासमक्ष स्विकारताच सापळा पथकाने त्याला ताब्यात घेतले. जळगाव अॅन्टीकरप्शन विभागाचे पोलिस उप अधिक्षक सतिष भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संजोग बच्छाव, सहायक फौजदार दिनेशसिंग पाटील, पोहेकॉ.अशोक अहीरे, पोहेकॉ.सुनिल पाटील, पोहेकॉ.रविंद्र घुगे, पोना.मनोज जोशी, पोना.सुनिल शिरसाठ, पोना.जनार्धन चौधरी, पोकॉ.नासिर देशमुख, पोकॉ.ईश्वर धनगर, पोकॉ.प्रदिप पोळ, पो. कॉ. .महेश सोमवंशी आदींनी सापळ्यात सहभाग घेतला.