जळगाव शहरात बालिकेवर अत्याचार

काल्पनिक छायाचित्र

जळगाव : जळगाव शहरातील गोलाणी मार्केट परिसरात भिक्षा मागून उदरनिर्वाह करणा-या दहा वर्षाच्या बालिकेवर अज्ञात नराधमाने अत्याचार केल्याची घटना आज दुपारी नागरिकांच्या सतर्कतेने उघडकीस आली. शहर पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी धाव घेत तपास सुरु केला.

दरम्यान नराधम आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाला होता. याप्रकरणी सीसीटीव्ही फुटेजचा आधार घेवून नराधमाचा शोध सुरु आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येत असल्याचे समजते. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here