तरुणास मारहाण प्रकरणी दोघे फरार अटकेत

जळगाव : कुसुंबा येथील तरुणास मारहाण, शिवीगाळ व दमदाटी करुन फरार झालेल्या दोघा तरुणांना एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. उद्या दोघांना न्यायालयात हजर केले जाणार आहे.

फेब्रुवारी महिन्यात कुसुंबा गावात दिपक गोपाळ कोळी या तरुणास अक्षय भास्कर सोनवणे, भास्कर शंकर सोनवणे, अमर भास्कर सोनवणे, सागर मधुकर कांडेलकर या चौघांनी मिळून मारहाण केली होती. तु गल्लीतील दादा झाला आहे असे म्हणत लाकडी काठी व कोयत्यासारख्या हत्यार हातात घेत कॉलर पकडून दिपक यास शिवीगाळ व दमदाटी केली होती. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनला रितसर गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर अक्षय सोनवणे यास अटक करण्यात आली होती. अक्षय सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. यातील अमर भास्कर सोनवणे व सागर मधुकर कांडेलकर या दोघांना अटक करण्यात आली असून उद्या 18 जून रोजी न्यायालयात हजर केले जाणार आहे. भास्कर शंकर सोनवणे अद्याप फरार असून पोलिस पथक त्याच्या मागावर आहे. पो.नि. प्रताप शिकारे यांना मिळालेल्या माहितीनुसार स.पो.नि. मोरे, सहायक फौजदार अतुल वंजारी, हे.कॉ. रतीलाल पवार, हे.कॉ. गफ्फार तडवी, पो.कॉ. सिद्धेश्वर डापकर व सतीष गर्जे यांनी दोघा आरोपींना ताब्यात घेत अटक केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here