उच्च न्यायालयाने जामीन नाकारलेला संशयीत मोकाट

जळगाव : घरगुती हिंसाचार कायद्यानुसार रामानंद नगर पोलिस स्टेशनला दाखल गुन्ह्यातील संशयीत आरोपी अद्याप फरार आहे. या संशयीताचा जिल्हा सत्र व औरंगाबाद उच्च न्यायालयाने जामिन नाकारला आहे. या फरार संशयीत आरोपीला तातडीने अटक होण्याची मागणी संबंधीत फिर्यादी महिलेने केली आहे.

हितेश राजेंद्र चव्हाण (रा. नंदुरबार) असे या गुन्ह्यातील फरार संशयीताचे नाव आहे. जळगाव येथील तरुणीचा नंदुरबार येथील हितेंश चव्हाण या तरुणासोबत सन 2018 मधे विवाह झाला. विवाहानंतर सदर तरुणी नंदुरबार येथे सासरी नांदण्यास गेली होती. आपल्या पतीचे एका महिला पोलिस कर्मचा-यासोबत प्रेमसंबंध असल्याचा या तरुणीचा आरोप आहे. या विषयावरुन दोघा पती पत्नीत वादाची ठिणगी पडली. या प्रकरणी जळगाव रामानंद नगर पोलिस स्टेशनला गु.र.न. 88/2021 भा.द.वि. 498 (अ), 313, 420, 504, 506, 34 नुसार 27 मार्च 2021 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी संशयीत आरोपीचा जामीन जिल्हा सत्र व औरंगाबाद उच्च न्यायालयाने नाकारला आहे. तरी त्याला लवकरात लवकर अटक होण्याची मागणी फिर्यादीने केली आहे. या प्रकरणातील महिला पोलिस कर्मचारी नोटीस बजावून देखील पोलिस स्टेशनला हजर झाली नसल्याचे समजते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here