फेसबुकवर महिलेची बदनामी;आरोपीला पोलिसांनी केली अटक

On: July 10, 2020 5:57 PM

अहमदनगर : फेसबुकवर बनावट खाते तयार करुन महिलेची बदनामी करणा-या आरोपीस सायबर पोलिसांनी अटक केली आहे.गणेश पांडुरंग गायकवाड (३०) रा. सिद्धार्थनगर अहमदनगर असे अटकेतील आरोपीचे नाव आहेगणेश गायकवाड याने १३ एप्रिल रोजी अहमदनगर येथील एका महिलेच्या नावे बनावट फेसबुकवर खाते तयार केले होते.

या माध्यमातून त्याने महिलेचा भाऊ व मित्रांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून चॅटींग केली होती. तसेच महिलेचा तिच्या मैत्रिणीसह असलेला फोटो फेसबुकवर शेअर केला. याप्रकरणी सदर महिलेने सायबर पोलीस स्टेशनला तक्रार केली होती. पोलिसांनी या गुन्ह्याचा तांत्रिक तपास केला.

आरोपीची माहिती संकलीत करून त्याला अटक केली. न्यायालयाने त्याला ११ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. वैयक्तिक रागातून आपण हे कृत्य केल्याची कबुली आरोपीने पोलिसांना दिली आहे. 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment