मुंबई : “क्राईम पेट्रोल”, “सावधान इंडीया” या गुन्हेगारी कथानकांवर आधारीत मालिकांमध्ये काम करणा-या दोघा अभिनेत्रींना चोरीच्या गुन्ह्यात पोलिसांनी अटक केली आहे. सुरभी सुरेंद्रलाल श्रीवास्तव आणि मोसिना मुख्तार शेख अशी त्यांची नावे आहेत. कोरोना कालावधीत अनेक अभिनेत्रींच्या हातातून काम गेल्यामुळे काही अभिनेत्री वाममार्गाला लागल्याच्या घटना यापुर्वी उघडकीस आल्या आहेत. काही स्ट्रगलर अभिनेत्रींनी देह व्यापाराकडे जाण्याचा मार्ग पत्करल्याचे काही दिवसांपुर्वी उघड झाले होते. कोरोनाच्या सुरुवातीच्या लाटेत एका अभिनेत्रीने तर आत्महत्या केल्याची घटना देखील उघडकीस आली होती. आत्महत्या करणारी ती अभिनेत्री देखील गुन्हेगारी मालिकांमधे काम करणारी कलावंत होती.
‘क्राईम पेट्रोल’, ‘सावधान इंडिया’ अशा गुन्हेगारी मालिकांमधे रोल करणा-या दोघा अभिनेत्रींनी मुंबईच्या पॉश इमारतीत चोरी केली आहे. लॉकडाऊन कालावधीत हातातून काम निघून गेल्यामुळे चोरी केल्याचे त्यांनी कबुल केले आहे. बॉलीवूड मधे संघर्षाच्या वाटेवरील या दोन्ही अभिनेत्री आरेमध्ये त्याच्या मित्राकडे राहण्यास आल्या होत्या. हा मित्र पेईंग गेस्ट ठेवत होता. या दोघा अभिनेत्री तेथे राहण्यास जाण्यापुर्वी त्याठिकाणी एक पेईंग गेस्ट रहात होता. त्याच्या लॉकरमधील 3 लाख 28 हजार रुपयांची चोरी करत त्या पसार झाल्या होत्या. या प्रकरणी
अगोदरच राहणा-या पेईंग गेस्टचे पैसे यांनी चोरले. या दोन अभिनेत्रींना चोरीच्या आरोपाखाली स्थानिक पोलिसांकडून अटक केली आहे. सुरभी सुरेंद्र लाल श्रीवास्तव आणि मोसिना मुख्तार शेख या दोघा संशयीतांविरुद्ध त्याने पोलिसात तक्रार दाखल केली. सीसीटीव्ही फुटेजमधे त्या पळून जातांना आढळून आल्या. त्यांना अटक करण्यात आली. कोरोनामुळे लॉकडाऊन कालावधीत अनेक मालिकांचे शुटींग बंद झाले. त्यामुळे गुन्हेगारी मालिकेत काम करणा-या या अभिनेत्रींचे पाऊल ख-या गुन्हेगारीकडे वळले. या दोन्ही अभिनेत्री स्ट्रगलर म्हणून आल्या होत्या. काही वेब सिरीजमधे त्यांना काम मिळाले होते.