ओशो रजनीश आश्रमाची पुण्यातील जमीन विक्रीला

पुणे : पुणे येथील मोक्याच्या जागेवरील ओशो रजनीश यांच्या आश्रमाची जागा विक्रीस काढण्यात आली आहे. त्यामुळे ओशो रजनीशांच्या काही अनुयायांनी विरोध केला असून नवा वाद निर्माण झाला आहे. सदर जमीन 3 एकर असून हा व्यवहार 107 कोटी रुपयात ठरत असल्याचे समजते. उद्योजक राजीव बजाज यांनी हा भुखंड विकत घेण्याची तयारी केली आहे. विश्वस्तांकडून धर्मदाय आयुक्तांकडे जमीन विक्रीची परवानगी मागण्यात आली आहे.

उद्योजक राजीव बजाज यांच्या बंगल्याला लागून ओशो रजनीश यांच्या आश्रमाची जागा आहे. कोरोनाचे संकट उभे राहिल्यामुळे हा आश्रम गेल्या दहा महिन्यापासून बंद आहे. त्यामुळे आश्रमाचा खर्च पेलवला जात नसल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे आश्रमाच्या मालकीचा हा भुखंड विकून खर्च भागवण्याची तयारी चालवली जात आहे. उद्योजक राजीव बजाज यांना आश्रमाची जागा विक्री करण्याबाबत सामंजस्य करार झाला असल्याचे म्हटले जात आहे. मात्र यावर भाष्य करण्यास कुणी तयार नसल्याचे देखील समजते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here