नाशिक : नाशिक येथील जाकीर हुसेने रुग्णालयात 21 एप्रिल रोजी ऑक्सिजन गळतीची घटना घडली होती. या दुर्दैवी घटनेत मोठ्या प्रमाणात प्राणहाणी झाली होती. या दुर्दैवी घटनेत अनेकांना आपला जिव गमवावा लागला. जिव गमावलेल्या व्यक्तींच्या कुटूंबियांना सरकार व महापालिका यांनी प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली होती.
ऑक्सीजन गळतीच्या घटनेत घरातील कर्ता पुरुष गेल्यामुळे घरातील त्याची पत्नी, वृद्ध आई वडील यांच्या उदरनिर्वाहासाठी मिळालेले दहा लाख रुपये घेऊन सुन फरार झाल्याची घटना नाशिक येथे घडली आहे. त्यामुळे जिव गमावलेल्या कर्त्या पुरुषाचे आईवडील मात्र पुन्हा उघड्यावर आले आहेत. सुनेने आपल्याला फसवल्याचे लक्षात येताच या निराधार वृद्ध दाम्पत्याने जिल्हाधिकारी कार्यालय गाठत आपली आपबिती कथन केली. पिरसिंग महाले आणि लता महाले असे या वृद्ध दाम्पत्याची नावे आहेत. सदर मदतनिधी मिळण्याकामी कागदपत्रावर सासू व सास-याच्या हातांचे ठसे घेण्यात आले होते.