नवी दिल्ली : भारतीय बँकांची फसवणूक करुन विदेशात पळून जाणारे विजय मल्ल्या, नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी या तिघांची 9371 करोड रुपयांची संपत्ती बँकांकडे हस्तांतरित करण्यात आली आहे. ईडीकडून या तिघांची तब्बल 18 हजार कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आली होती. ही रक्कम बँकाच्या बुडित कर्जाच्या जवळपास 80 टक्के एवढी आहे.
विजय मल्ल्या, नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी या तिघांना विदेशातून भारतात आणण्याचे प्रयत्न जारी आहेत. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांकडून कर्जरुपाने घेतलेली रक्कम त्यांनी आपल्या बेनामी कंपन्यांमध्ये वळती करुन मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार केला होता. या तिघांनी बँकांचे एकुण 22,585.83 कोटी रुपये बुडवले होते. ‘ईडी’कडून या तिघां जणांच्या देश-विदेशातील मालमत्ता जप्त झाल्या आहेत.
जप्त मालमत्तेपैकी 969 कोटींची मालमत्ता विदेशात आहेत. आतापर्यंत सरकारी बँकांना त्यांची 8441 कोटीची रक्कम परत मिळाली आहे. विजय मल्ल्या यावेळी न्यायालयीन लढा देण्यात अडकला आहे. नीरव मोदी व मेहुल चोक्सी हे सध्या तुरुंगात बसले आहेत. त्यांना भारतात आणण्याच्या हालचाली सुरु आहेत.