अनैतिक संबंधातून पत्नीकडून पतीचा खून

On: July 10, 2020 8:12 PM


बारामती : अनैतिक संबंधातून पत्नीनेच पतीचा खून करत काटा काढल्याची घटना बारामती तालुक्यातील सुपे नजीक चोरमलेवस्तीवर घडली. काही दिवसांपूर्वी साप चावल्याची बतावणी करत पत्नी व प्रियकराने मयताचा अंत्यविधी उरकण्याचा प्रयत्न केला.

मात्र, पोलिसी खाक्या दाखवताच आरोपीने खून केल्याची माहिती दिली.आरोपी पत्नी आणि प्रियकर दादा कामा महानवर (रा. पाटस, ता. दौंड) यांनी कामा बापू मदने याची तोंड दाबून नाजूक भागावर मारहाण करत हत्या केली.

या प्रकरणी आरोपींना आज न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने दोघांना पाच दिवस पोलिस कोठडी सुनावली.पत्नीच्या अनैतिक संबंधात पती कामा बापू मदने यांचा अडथळा होत असे. त्यामुळे पत्नीने प्रियकरासोबत पती कामा मदने यांचे तोंड दाबून, लाथा मारुन जीवे ठार केले.

पती कामा यास साप चावल्याचा बनाव आरोपींनी केला होता. पत्नी व प्रियकराने अंत्यविधी उरकण्याची घाई करत पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. मात्र कामाचा भाऊ बापू मदने यास संशय आला.

त्याने पोलिसांकडे रीतसर फिर्याद दिली. तपासात पत्नी व प्रियकराचे मोबाईल रेकॉर्डिंग हस्तगत करण्यात आले. दोघा आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले. कसुन चौकशीअंती त्यांनी गुन्हयाची कबुली दिली.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment