चोरीच्या मोटारसायकलसह दोघे अटकेत

On: June 25, 2021 11:02 PM

जळगाव : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आज दोघा मोटार सायकल चोरट्यांना ते वापरत असलेल्या चोरीच्या मोटारसायकलसह ताब्यात घेतले आहे. पुढील तपासकामी दोघा चोरट्यांना मोटारसायकलसह धरणगाव पोलिस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे. संजय उर्फ कालु बळीराम कोळी (23) रा. वढोदा ता. यावल व गोलु कृष्णनाथ कोळी (21) रा. शिरागड ता. यावल असे अटकेतील दोघा चोरट्यांची नावे आहेत.

तिन महिन्यापुर्वी धरणगाव येथील एरंडोल रस्त्यावरील हॉटेल मयुरच्या बाहेर लावलेली मोटार सायकल दोघांनी त्यांचा परिचीत असलेला गोटू सोनवणे (रा. रवंजा ता. एरंडोल)  याच्या मदतीने चोरी केली होती. त्या मोटारसायकलच्या नंबर प्लेटवर “देव बरोबर करतो” असे लिहीले होते.

पो.नि. किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार अशोक महाजन, पो.हे.कॉ.विजयसिंग धनसिंग पाटील, पो.हे.कॉ. सुधाकर रामदास अंभोरे, पो.ना.नितीन प्रकाश बाविस्कर, हे.कॉ. जितेंद्र पाटील, पो.ना.प्रीतम पिंताबर पाटील, पो.ना.राहुल जितेंद्रसिंग पाटील, भारत पाटील आदींनी या कारवाईत सहभाग घेतला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment