गावठी कट्टा बाळगणा-यास अटक

On: June 26, 2021 4:07 PM

जळगाव : जळगाव शहराच्या पिंप्राळा परिसरातील भवानी मंदिराजवळ गावठी बनावटीचे पिस्टल बाळगणा-या तरुणास रामानंद नगर पोलिसांच्या पथकाने रात्री दहा वाजेच्या सुमारास अटक केली आहे. महेश वासुदेव पाटील (हिराशिवा कॉलनी) असे अटकेतील तरुणाचे नाव असून त्याच्या कब्जातून पिस्टल व रिकामे मॅगझीन हस्तगत करण्यात आले आहे. या प्रकरणी सागर देवरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार रामानंद नगर पोलिस स्टेशनला भारतीय हत्यार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास स.पो.नि. दिपक बिरारी करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment