अभिनेत्री हिना पांचालसह सर्वांनी रिचवले लाखो रुपयांचे मद्य

नाशिक : बिग बॉस फेम अभिनेत्री हिना पांचालसह इतर अभिनेत्री व कोरिओग्राफर तसेच अन्य अशा एकुण 22 जणांनी इगतपुरी येथील आलिशान बंगल्यात सुमारे सव्वा लाख रुपयांचे महागडे मद्य रिचवले. हे सर्व 22 जण तिन दिवसांचा मुक्काम करण्याच्या उद्देशाने आले होते. या हायप्रोफाईल मद्य रिचवणा-या व अंमली पदार्थ सेवन करणा-या समुहाने “हवाईयन” संकल्पनेप्रमाणे तिन दिवसांच्या मुक्कामाचा बेत आखला होता. मात्र पोलिसांनी त्यांचा बेत उधळून लावला. अभिनेत्री हिना पांचालसह अकरा महिला व सहा पुरुष यांना एक दिवस तर इतर सहा पुरुषांना नऊ दिवस पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

सचिन पाटील (पोलिस अधिक्षक नाशिक ग्रामीण) , शर्मिष्ठा वालावलकर (अप्पर पोलिस अधिक्षक)

मुंबईपासून इगतपुरी जवळ आहे. कसारा घाटामार्गे येतांना वाटेत इगतपुरी लागते. पियुष सेठीया या धनिकाचा वाढदिवस जोशात साजरा करण्यासाठी इगतपुरी येथील स्काय ताज व्हिला व स्काय लगून व्हिला या दोन खासगी बंगल्यांची निवड करण्यात आली होती. या वाढदिवसाच्या निमीत्ताने रेव्ह पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.

नाशिक ग्रामीणच्या अप्पर पोलिस अधिक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे या बंगल्यावर मध्यरात्री छापा घालण्यात आला. त्यात रेव्ह पार्टीदरम्यान बॉलीवुड अभिनेत्रींसह सर्वांचा थयथयाट पोलिसांना दिसून आला. अटकेतील सर्वांविरुद्ध इगतपुरी पोलिस स्टेशनला रितसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आज 28 जून रोजी सर्वांना न्यायालयात हजर करण्यात आले होते. घटनास्थळावरील मद्याच्या रिकाम्या बाटल्यांचा अंदाज घेतला असता महागड्या ब्रॅंडची सव्वा लाख रुपयांची दारु रिचवण्यात आली होती. याशिवाय ड्रग्ज, कोकेन, चरस व गांजा असे अंमली पदार्थ देखील पोलिसांच्या हाती लागले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here