मुंबई : प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अॅंटेलिया बंगल्याबाहेर वाहनात स्फोटके सापडल्याप्रकरणी अटकेतील निलंबीत स.पो.नि. सचिन वाझे यांची एनआयए कडून चौकशी सुरु आहे. या तपासादरम्यान तपास पथकाला त्यांच्या कपाटात कागदपत्रांसह एक हातोडा देखील सापडला आहे. मुंबई पोलिस मुख्यालयातील सिआययु कॅबीनमधील कपाटात हा हातोडा तपास पथकाला मिळून आला आहे.
या हातोड्याचा वापर अॅंटेलिया स्फोटके प्रकरणातील पुरावे नष्ट करण्यासाठी करण्यात आल्याची शक्यता वर्तवली जात आहे. सचिन वाझे यांच्याकडून विविध महागड्या चारचाकी गाड्या देखील जप्त करण्यात आल्या होत्या. त्या वाहनांच्या नंबर प्लेट बदलण्यात आल्या असल्याचे तपासात उघड झाले आहे. या हातोड्याचा उपयोग नंबर प्लेट बदलण्यासाठी केला होता का? अशी देखील शक्यता वर्तवली जात आहे.