तिघा मोटार सायकल चोरांना अटक

On: July 11, 2020 1:21 PM

24 मोटार सायकल जप्त

जळग़ाव : चाळीसगाव, धुळे, मालेगाव व इतरत्र परिसरातील दुचाकी चोरुन त्या विक्री करणा-या तिघा अट्टल चोरांना चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. चाळीसगाव ग्रामीण पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक होत आहे.

याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्हयातील प्रमुख आरोपी विवेक शिवाजी महाले याच्या ताब्यातून आठ मोटारसायकली तर इश्वर शिवलाल भोई याच्याकडून सात दुचाकी ताब्यात घेण्यात आल्या आहेत. या दुचाकींची किंमत 11 लाख 40 हजार रुपये आहे. अटकेतील चोरांकडून इतर गुन्हयांची उकल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment