तलवारीसह तरुण एलसीबीच्या ताब्यात

जळगाव : मनुर ता. बोदवड येथील सागर रामचंद्र बावस्कर या तरुणास जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तलवारीसह ताब्यात घेतले आहे. बोदवड ते मनुर रस्त्यावर तलवारीसह तो फिरत असून गंभीर गुन्हा करण्याच्या तयारीत सागर असल्याची माहिती पो.नि. बकाले यांना समजली होती. त्यानुसार सागर रामचंद्र बावस्कर यास हे.कॉ. रविंद्र गायकवाड, राजेंद्र पवार, उमेशगिरी गोसावी यांच्या पथकाने त्याला भैरवनाथ मंदीर परिसरातून तलवारीसह ताब्यात घेतले. तलवार त्याने शर्टाच्या आत बाळगली होती. त्याच्याविरुद्ध बोदवड पोलिस स्टेशनला भारतीय हत्यार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला बोदवड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here