तरुणीची गळफास घेत आत्महत्या

On: July 11, 2020 6:11 PM

कोपरगाव : कोपरगाव तालुक्याच्या कोकमठाण ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या आत्मा मालिक ध्यानपीठ कर्मचारी वसाहतीत एका तरुणीने गळफास घेत आपली जिवनयात्रा संपवली आहे. या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे.

उज्वला शेळके असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. तिच्या आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. कोपरगाव शहर पोलिस स्टेशनला या प्रकरणी अकस्मात मृत्युची नोंद घेण्यात आली आहे. तरुणीचे वडील जंगली महाराज आश्रमात नोकरीला आहेत.

ते आपल्या परिवारासोबत कर्मचारी वसाहतीत राहतात. भगवान बाबुराव शेळके (55) यांनी दिलेल्या खबरीनुसार कोपरगाव शहर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे.

आज पहाटे अडीच वाजेच्या सुमारास नैसर्गिक विधीसाठी उज्वला शेळके घरातून गेली होती. त्यानंतर तिने घराबाहेरील पढवीच्या लोखंडी अँगलला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेतला. बराच वेळ झाला तरी ती घरात का आली नाही म्हणून तिचा तपास करण्यासाठी तिचे आई वडील बाहेर आले.

त्यावेळी हा प्रकार लक्षात आला. घटनास्थळावर पोलिस निरीक्षक राकेश मानगावकर, सहाय्यक पोलिस निरीक्षक दीपक बोरसे व सहका-यांनी भेट देत पंचनामा केला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment