सिने अभिनेत्री यामी गौतमला ईडीचे समन्स

मुंबई : काही दिवसांपुर्वी दिग्दर्शक आदित्य धरसोबत लग्नाच्या बेडीत अडकलेली व चर्चेत आलेली सिने अभिनेत्री यामी गौतमला इडीचे समन्स बजावण्यात आले आहेत. लग्न आटोपून परत आल्यानंतर तिला हे समन्स मिळाले आहेत.

येत्या 7 जुलै रोजी यामीला ईडीच्या समक्ष चौकशीकामी हजर व्हावे लागणार आहे. ईडीने यामीला बजावलेले हे दुसरे समन्स आहे. परकीय चलन व्यवस्थापन अधिनियम कायद्यानुसर हे समन्स बजावले आहेत. आर्थिक घोटाळा केल्याचा ईडीचा यामीवर संशय आहे. यामी गौतमच्या बँक खात्यात परकीय चलनाचे आदानप्रदान झाले असयाचे ईडीला समजले आहे. ईडीचे हे तिला दुसरे समन्स असून यावेळी तिला चौकशीकामी हजर राहणे आवश्यक आहे. अन्यथा तिच्या अटकेची शक्यता वर्तवली जात आहे.

उरी, काबिल, सनम रे, गिन्नी वेड्स सनी, विकी डोनर अशा विविध सिनेमात यामीने भुमिका केल्या आहेत. सैफ अली खान व अर्जुन कपूर अभिनीत “भूत पुलिस” या सिनेमात तिला काम मिळाले आहे. उरी द सर्जिकल स्ट्राईक या चित्रपटात दिग्दर्शक आदित्य उरी सोबत काम करत असतांना दोघांचे प्रेम जुळले व ते लग्नाच्या बेडीत अडकले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here