तथाकथित संताचा केला अश्लिल व्हिडीओ?

On: July 11, 2020 7:13 PM

जोधपूर : राजस्थानच्या जोधपूर येथील एका तथाकथित संत महात्म्याने एका तरुणीसह तिच्या परिवारावर गंभीर आरोप केले आहेत. या तरुणीसह तिच्या परिवाराने आपला अश्लिल व्हिडीओ तयार करुन पैशांची मागणी केल्याचा आरोप या तथाकथित संताने पोलिसांकडे केलेल्या तक्रारीत केला आहे.

याप्रकरणी पोलिसांनी कमिश्नरेट अंतर्गत सीएचबी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी संबंधीत मुलगी व तिच्या परिवाराला आरोपींच्या यादीत टाकण्यात आले आहे.

तक्रारीनुसार तथाकथित संत व्यक्तीला संबंधीत तरुणीने बालाजी परिसरातील घरात नाश्ता करण्यासाठी बोलावले होते. त्यानुसार ते तरुणीच्या घरी गेले. त्यानंतर, संबंधित तरुणीने या संत महात्म्यांना तिच्या खोलीत नेले. त्याठिकाणी अगोदरच काही मंडळी हजर होती.

संत आत गेल्यावर त्यांना मद्याची बाटली देवून बळजबरी पिण्यास सांगितल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. त्यानंतर संतांचे वस्त्रविरहित असभ्य वर्तनाचा व्हीडीओ तयार करण्यात आल्याचे म्हटले आहे. या व्हीडीओ मुळे आपल्या संत प्रतिमेला तडा जाईल व बदनामी होईल अशी धमकी आपणास देण्यात आल्याचे तथाकथीत संत व्यक्तिने म्हटले आहे.

बदनामी टाळण्यासाठी या परिवाराने दहा लाख रुपयांची मागणी केल्याचा आरोप संत व्यक्तीने केला आहे. तथाकथित संत व्यक्तीच्या तक्रारीवरुन सिएचबी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी चौकशी सुरु आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment