मुंबई : संदेसरा घोटाळा प्रकरणी ईडीने सिने अभिनेता दिनो मोरिया आणि अहमद पटेल यांचा जावई इरफान अहमद सिद्दीकी यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. संक्त वसुली संचलयानकडून दोघा जणांची अनुक्रमे 1.4 आणि 2.41 कोटी रुपयांची संपत्ती जप्त करण्यात आली आहे.
गुजरात राज्यातील उद्योजक असलेल्या संदेसरा बंधूंनी 14500 कोटी रुपयांचे कर्ज घेत बँकेची फसवणूक केली होती. या फसवणूकीच्या तपासात इरफान सिद्दीकी व अभिनेता दिनो मोरिया यांचा सहभाग ईडीला दिसून आला आहे. या आर्थिक गैर व्यवहार प्रकरणी ईडीकडून दोघांकडून कोट्यावधी रुपयांची संपत्ती जप्त करण्यात आली आहे.
स्टर्लिंग बायोटेक कंपनीचे चेतन संदेसरा, नितीन संदेसरा आणि दिप्ती संदेसरा या तिघांनी बनावट कंपन्या स्थापन केल्या होत्या. या कंपन्यांच्या नावे संदेसरा बंधुंनी आंध्रा बँक, युको बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, अलाहाबाद बँक आणि बँक ऑफ इंडियाच्या परदेशातील शाखांमधून कर्ज घेतले होते. या फसवणूकीच्या माध्यमातून संदेसरा बंधूंनी 14500 कोटी रुपयांमधे बॅंकांची फसवणूक केली होती. या घोटाळ्यानंतर संदेसरा बंधू भारतातून फरार झाले होते. ईडीच्या तपासादरम्यान अभिनेता दिनो मोरिया आणि इरफान सिद्दीकी या दोघांनी संदेसरा बंधुंशी आर्थिक व्यवहार केल्याचे उघड झाले. त्यामुळे या दोघांवर ईडीने कारवाई केली आहे.