आजचे राशी भविष्य (29/9/21)

मेष : पुर्ण विश्वास संपादन होईपर्यंत कुणाला वचन देवू नका. लॉटरीसारख्या मोहात न पडलेले बरे.

वृषभ : घरात आनंदी वातावरण राहील. दिर्घ मुदतीसाठी पैसे अडकवणे चुकीचे ठरु शकते.

मिथुन : केलेल्या कामाचे कौतुक होईल. मित्र परिवारात उत्साही वातावरण राहील.

कर्क : तुमच्या बोलण्याचा इतरांवर प्रभाव चांगला प्रभाव पडेल. खाण्यापिण्याकडे लक्ष द्यावे लागेल.

सिंह : मनावरील ताणतणाव कमी करावा लागेल. व्यवसायात जास्तीची जबाबदारी घेवू नका.

कन्या : न्यायालयीन कामे मार्गी लागण्याची शक्यता. काही ठिकाणी तडजोडी कराव्या लागतील.

तुळ : आर्थिक लाभ होतील. नातेवाईकांशी बोलतांना संयम ठेवावा लागेल.

वृश्चिक : मनासारखी कामे होतील. गोड बोलून विविध कामे करुन घ्यावे लागतील.

धनु : गैरसमज झाले असतील तर उलगडा करुन घ्यावा लागेल.

मकर : आपल्या हातून एखादे चांगले काम घडेल. तब्येतीची काळजी घ्यावी लागेल.

कुंभ : मिळालेल्या माहितीची खातरजमा करुन घ्यावी लागेल. भागीदारीत व्यवसाय टाळावा.

मीन : शत्रूवर यशस्वी मात कराल. परदेशवारीचे मार्ग सोपे होतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here