चोरलेल्या रिक्षासह दोघे चोरटे ताब्यात

On: July 4, 2021 4:04 PM

जळगाव : जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर लावलेली रिक्षा चोरुन नेणारे दोघे चोरटे एमआयडीसी पोलिसांना गवसले असून त्यांना अटक करण्यात आली आहे. शाहरुख जहुर खाटीक (तांबापुरा – जळगाव) आणि फारुख शेख मुस्तफा (रजा कॉलनी शेरा चौक जळगाव) अशी अटकेतील दोघा चोरट्यांची नावे आहेत.

गोपाल युवराज चौधरी हे रिक्षाचालक असून ते 6 मार्च रोजी सकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास त्यांच्या मालकीच्या रिक्षाने (एमएच 19 व्ही 3688) भाजीपाला घेण्यासाठी गेले होते. त्यांनी त्यांची रिक्षा भाजीपाला मार्केटच्या बाहेर असलेल्या रोहीणी स्वीट मार्टच्या बाजूला उभी केली होती. भाजीपाला घेऊन बाहेर आल्यावर रिक्षा चोरी झाल्याचा प्रकार त्यांच्या लक्षात आला. याप्रकरणी त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार एमआयडीसी पोलिस स्टेशनला रिक्षा चोरीचा गुन्हा दाखल केला होता.

एका गुन्ह्याचा तपासात शाहरुख जहुर खाटीक (तांबापुरा – जळगाव) आणि फारुख शेख मुस्तफा (रजा कॉलनी शेरा चौक मेहरुण – जळगाव) यांची तपासणी सुरु असतांना त्यांनी या गुन्ह्यातील रिक्षा चोरीची कबुली दिली आहे. त्यांना 1 जुलै रोजी ताब्यात घेत अटक करण्यात आली. त्यांंच्याकडून चोरीची रिक्षा हस्तगत करण्यात आली आहे. गुन्ह्याच्या तपासकामी पो.नि.शिकारे यांच्या निर्देशाखाली सहायक फौजदार अतुल वंजारी, मुदस्सर काझी, योगेश बारी, इमरान सय्यद, जमीर शेख आदींनी सहभाग घेतला. दोघांची सध्या न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment