बिग बी सोबत काम केलेल्या कलाकारास अटक

On: July 4, 2021 11:15 PM

मुंबई : अमिताभ बच्चन अभिनीत “झुंड” या चित्रपटात अभिनय करणा-या तरुण कलाकारास चोरीच्या गुन्ह्यात पोलिसांनी अटक केली आहे. प्रियांशु अर्थात बाबू रवी क्षेत्री असे अटकेतील तरुणाचे नाव आहे. वाईट संगतगुण जडल्यामुळे प्रियांशु यास चोरीचा नाद लागला होता. अखेर तो पोलिसांच्या हाती लागला.

अमिताभ बच्चन यांच्या ‘झुंड’ या चित्रपटात त्यांच्यासमवेत काम करण्याची त्याला संधी मिळाली. कुसंगतीमुळे तो गेल्या काही दिवसांपासून रेल्वेत चोरीचे प्रकार करत होता. त्याचे वडील मजुरी करतात. हलाखीची परिस्थिती असतांना त्याला अभिनयाची संधी मिळाली होती. मात्र कुसंगतीमुळे तो भरकटला. थेट अमिताभ बच्चन यांच्यासमवेत काम करण्याची संधी मिळाल्यामुळे तो चर्चेत आला होता. त्याच्याकडून पोलिसांनी चोरीचे 11 मोबाईल जप्त केले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment