भरधाव ट्रकने उडवले दुचाकीस्वारांना

मयत

चाळीसगाव : भरधाव ट्रकने दुचाकीस्वारांना उडवल्याची घटना आज सायंकाळी घडली.सायंकाळी साडे सात वाजता मेहुनबारे पोलीस स्टेशन पासून जवळच घडलेल्या दुर्दवी घटनेत दोघे तरुण जागीच ठार झाले.दोघे तरुण चाळीसगाव तालुक्यातील भोरस गायरान येथील रहिवासी होते.

मयत झालेला किरण मिलिंद मोरे (३२) हा चालक होता तर दुसरा तरुण पंकज अशोक येवले वाहने भाड्याने देण्याचे काम करत होता.धुळे नजीक नेर कुसुंबा येथे दोघे तरुण लग्नाला मोटरसायकलने गेले होते. परतीच्या प्रवासात पलीकडूनयेणा-या भरधाव ट्रकने त्यांना जोरदार धडक दिली.

या अपघातात किरण मिलिंद मोरे व पंकज येवले दोघे जण घटनास्थळी ठार झाले. अपघाताची महिती समजताच पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली.ट्रकखाली आलेल्या दोघांचे मृतदेह जेसीबीच्या मदतीने काढण्यातआले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here