नागपूर : उप राजधानी नागपुर शहरात कुख्यात गुंडा अक्षय जयपुरे याची विटांनी ठेचून हत्या करण्यात आली आहे. नागपूर शहरातील पांढरबोडी भागात ही निर्घृण हत्येची घटना घडली आहे. अवैध दारु विक्रीच्या वादाची किनार या हत्येमागे असल्याचे म्हटले जात आहे. मयत अक्षय जयपुरे याच्यावर खुनासह विविध गुन्हे दाखल असल्याचे देखील म्हटले जात आहे. या हत्येच्या घटनेमुळे नागपूर शहरात खळबळ माजली आहे.
