मुंबई : अभिनेता सलमान खान याच्यासह त्याची बहिण अलवीरा या दोघांविरुद्ध चंदिगढ येथील एका उद्योजकाने आर्थिक फसवणूकीची तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीची दखल घेत चंदीगढ पोलिसांनी सलमानसह त्याच्या बिईंग ह्युमन कंपनीतील अधिकाऱ्यांना समन्स जारी केले आहे. या प्रकरणाची चौकशी सुरु आहे.

अरुण गुप्ता असे तक्रारदार उद्योजकाचे नाव आहे. अरुण गुप्ता यांनी बिंग ह्युमनची एक शाखा चंदिगढ शहरात सुरु केली होती. या व्यवहारात गुप्ता यांच्याकडून तिन कोटी रुपये घेण्यात आले होते. मात्र बरेच महिने उलटून देखील सामान काही मिळाले नाही. याबाबत गुप्ता यांनी बिंग ह्युमन कंपनीकडे तक्रार करुनही त्या तक्रारील केराची टोपली दाखवण्यात आली. शेवटी गुप्ता यांनी सलमान खानसह त्याची बहिण अर्पिता व कंपनीविरुद्ध आर्थिक फसवणूकीची तक्रार दाखल केली. याबाबतचे पुरावे म्हणून व्यावसायीक अरुण गुप्ता यांनी कराराची प्रत सादर केली आहे. सलमान खान याच्यावर विश्वास ठेवत गुप्ता यांनी सदर गुंतवणूक केली आहे. या व्यवहारातील गुंतवलेली रक्कम परत मिळावी अशी गुप्ता यांची अपेक्षा आहे.