औरंगाबाद : वाळूज – हिरापूर शिवारातील एका पडीक विहिरीत 8 जुलैच्या दुपारी सुमारे दिड वाजता एका तरुणाचा मृतदेह आढळून आला. मृतदेह कुजलेला असल्यामुळे परिसरात त्याची दुर्गंधी पसरली होती. साधारण 28 वर्ष वयाच्या तरुणाच्या या तरुणाच्या मृतदेहाच्या कमरेला दोरीच्या सहाय्याने दगड बांधलेला होता. हा घातपाताचा प्रकार असल्याचे म्हटले जात आहे.
विहीरीच्या आजुबाजूला काटेरी झाडे असल्यामुळे मृतदेह बाहेर काढण्यासाठी जेसीबी बोलावण्यात आला होता. अग्नीशमन दलाच्या जवानांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आल्यानंतर जागेवरच शव विच्छेदन करण्यात आले. मृतदेहाची ओळख पटण्यास वेळ लागला नाही. सदर मृतदेह दिपक सुभाष मुळे रा. गंगापूर या तरुणाचा होता. कायदेशीर प्रक्रीया पुर्ण केल्यानंतर मृतदेह नातलगांच्या ताब्यात देण्यात आला. वाळूज पोलिस स्टेशनचे पो.नि.संदिप गुरमे पुढील तपास करत आहेत.