बालकाची मातेने केली हत्या?

On: July 9, 2021 10:00 AM

अहमदनगर : नेवासे तालुक्यातील वरखेड येथील सोहम खिलारे या आठ वर्षाच्या बालकाची दगडाने ठेचून हत्या केल्याप्रकरणी त्याची आई सिमा हिस अटक करण्यात आली आहे. या खून प्रकरणी अजुन काही संशयीत असण्याची देखील शक्यता वर्तवली जात आहे.

याप्रकरणी सुरुवातीला हत्या झालेल्या बालकाच्या सावत्र बापावर पोलिसांचा संशय होता. मात्र तपासात होत गेलेल्या प्रगतीनुसार बालकाच्या आईवर संशयाची सुई स्थिरावत गेली. मुलाचा मृतदेह बघून आक्रोश करणा-या सीमाने अनेकांवर संशय घेत पोलिसांची दिशाभुल करण्याचा प्रयत्न केला.

सोहम खिलारे या बालकाची हत्या त्याची आई सीमा उत्तम खिलारे (वय ३२, रा. वरखेड, ता. नेवासे) हिने केल्याचा पोलिसांना दाट संशय असून त्या दृष्टीने तपास सुरु आहे. तिला न्यायायलासमक्ष हजर करण्यात आले. न्यायालयाने तिला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. या हत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून अनेक प्रश्न अनुत्तरीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment