अमरावती : चांदूर बाजार तालुक्यातील ब्राम्हणवाडा थडी येथील एका वयोवृद्ध महिलेचा अज्ञात मारेकऱ्याने तिच्या घरात जाऊन हत्या केल्याची घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली. या घटनेप्रकरणी ब्राम्हणवाडा पोलिसात अज्ञात आरोपीविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गिरीजाबाई अन्नाजी अमझरे (75) असे मयत वृद्ध महिलेचे नाव आहे.
गुरुवारी सकाळी साडेनऊ ते दहा वाजेच्या दरम्यान कुणीतरी अज्ञात व्यक्तीने गिरीजाबाईंच्या मानेवर वार करत तिची हत्या केली. ब्राम्हणवाडा पोलिसांसह एलसीबीकडूना या गुन्ह्याचा पुढील तपास सुरु आहे. मयत महिला व तिचा पती मुलांपासून विभक्त रहात होते. मयत वृद्ध महिलेचा पती घटनेच्या वेळी गावात राहणा-या मुलीच्या घरी गेले होते. परत आल्यानंतर त्यांना हा प्रकार आढळून आला. मारेक-यांचा शोध सुरु आहे.