मंदाकिनी खडसे यांना देखील बजावण्यात आले होते समन्स

मुंबई : माजी विरोधी पक्ष नेते एकनाथराव खडसे यांच्यासह त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांना देखील ईडीने समन्स बजावले होते अशी माहिती पुढे येत आहे. गुरुवारी एकनाथराव खडसे यांची ईडी कार्यालयात जवळपास 9 तास चौकशी झाली. पुणे येथील भोसरी एमआयडीसी जमीन व्यवहार प्रकरणी खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना अटक झाली आहे. त्यानंतर खडसे यांची चौकशी झाली. नव्याने पुढे आलेल्या माहितीनुसार खडसे यांच्याप्रमाणेच त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांना देखील ईडीने समन्स बजावले होते.

मात्र निवेदन देत त्यांनी चौदा दिवसांची वेळ मागून घेतली आहे. ईडीने मात्र त्यांच्या निवेदनाला अद्याप कुठलाही प्रतिसाद दिला नसल्याचे देखील समजते. 7 जुलै रोजी मंदाकिनी खडसे यांना ईडीने हजर राहण्यासाठी समन्स बजावले होते असे समजते. मात्र सौ. खडसे हजर राहिल्या नाहीत. चौकशी पुर्ण झाल्यानंतर एकनाथराव खडसे यांनी कोणतीही प्रतिक्रिया जाहीर केली नाही. खडसे यांनी ईडीच्या चौकशीला पुर्ण सहकार्य केल्याचे त्यांच्या वकिलांनी म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here