चोरट्यांची वक्रदृष्टी आता एटीएम वर शिव कॉलनी नजीक एटीएम फोडले

On: July 12, 2020 11:53 AM

जळगाव : लॉक डाऊन काळात आता चोरट्यांनी आपली नजर अर्थात टारगेट एटीएम सेंटर केल्याचे दिसून येत आहे.आज सकाळी शहरातील शिवकॉलनी नजीक महामार्गालगत स्टेट बँकेचे एटीएम गॅस कटरने फोडून १४ लाख रूपयांची कॅश गायब करण्यात आली आहे.

आज सकाळी या धक्कादायक घटनेचा उलगडा झाला.सदर बाब परिसरातील रहिवाशांच्या लक्षात येताच त्यांनी शाखाव्यवस्थापक दिवेश चौधरी यांना कळवले. प्राथमिक तपासणीअंती एटीएम गॅस कटरने तोडून चोरट्यांनी त्यातील १४ लाख ४१ हजार रूपयांची कॅश लांबवली आहे.

या एटीएममध्ये आणखी सात लाख रूपयांची कॅश असल्याचे दिसून आले. अप्पर पोलीस अधिक्षक भाग्यश्री नवटके यांनी घटनास्थळीभेट दिली. जिल्हा पेठ पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment