जळगाव : ओळखीच्या मुलीला मिठीत ओढून तिच्या गालांचा किस घेण्याचा प्रयत्न करणे तरुणाला महागात पडले आहे. त्याला थेट कारागृहात जाण्याची वेळ आली. दिगंबर शालिग्राम मुकुंदे असे कारागृहात रवानगी झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्याच्या विरुद्ध जळगाव जिल्हापेठ पोलिस स्टेशनला विनयभंगासह पोस्को कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे.

दिगंबर मुकुंदे हा तरुण व पिडीत मुलगी हे दोघे एकमेकांना परिचीत आहेत. दोघे एका ठिकाणी कामाला होते. त्यामुळे तिच्यासोबत असलेल्या ओळखीचा दिगंबरने गैरफायदा घेतला. शुक्रवारच्या दिवशी दुपारच्या वेळी दिगंबर पाणी पिण्याच्या निमीत्ताने तिच्या घरी गेला.
ती मुलगी घरात एकटी असल्याचे बघून त्याने तिला मिठीत ओढले. मला एक किस घेऊ दे असे म्हणत त्याने तिच्याजवळ आग्रहच केला. या प्रकाराने संतप्त झालेल्या अल्पवयीन मुलीने तिच्या पालकांना फोन करुन बोलावून घेतले. या प्रकरणी जिल्हा पेठ पोलिस स्टेशनला पोस्को व विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. दिगंबर मुकुंदे यास अटक करण्यात आली. आज न्यायालयाने त्याची कारागृहात रवानगी करण्याचे आदेश दिले.