मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री जुही चावला हिस दिल्ली उच्च न्यायालयाने 5 जी वायरलेस नेटवर्क विरोधात दाखल याचिकेकेबद्दल 20 लाखांचा दंड सुनावला होता. जुही चावला व्यतिरिक्त अजुन दोघांना देखील हा दंड ठोठावला होता. जुही चावलाच्या अर्जावरील सुनावणी आज दिल्ली उच्च न्यायालयात तहकूब करण्यात आली.

न्या. संजीव नरुला यांनी या 5 जी प्रकरणी सुनावणी करण्यापासून स्वत:ला दूर केले आहे. गेल्या सुनावणीच्या वेळी न्या. जे.आर. मिधा यांनी म्हटले होते की, याचिकाकर्त्याच्या अयोग्य वर्तनामुळे न्यायालयास धक्का बसला होता. जुहीसह इतर दोघे जण योग्य मानाने दंड भरण्यास देखील तयार नव्हते. न्यायमूर्ती मिधा यांनी म्हटले आहे की न्यायालयाने जुहीला अवमानाची नोटीस बजावली नव्हती तसेच हे देखील स्पष्ट होत आहे की अभिनेत्री जुही चावला अजूनही दंडाची रक्कम भरण्यास तयार नाही.
जून महिन्यात दिल्ली उच्च न्यायालयाने 5 जी वायरलेस नेटवर्क टेक्नॉलॉजीला आव्हान देणारी जुही चावलाची याचिका फेटाळून लावली होती. कायदेशीर प्रक्रियेचा दुरुपयोग केल्यामुळे ही याचिका फेटाळून लावण्यात आली. तसेच 20 लाख रुपयांचा दंड देखील न्यायालयाने ठोठावला. या निकालाविरुद्ध जुहीने परत दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली होती.