वडीलांसह भावाचा खून, भांडण सोडवण्याचा होता मनात राग

On: July 12, 2020 1:18 PM
मयत महेंद् आनंदा पाटील

जळगाव : भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या वडील व भावाला चाकूने भोसकून ठार केल्याची घटना रात्री जामनेर तालुक्यातील नांद्रा येथे घडली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

जामनेर तालुक्यातील नांद्रा येथे आनंदा कडू पाटील हे राहतात. त्यांचा मुलगा निलेश आनंदा पाटील हा शेजा-यांशी भांडण करत असे. शेजा-यांशी भांडण करु नको असे त्याला वडील आनंदा पाटील यांनी समजावण्याचा पुरेपुर प्रयत्न केला. मात्र तो समजून घेण्याच्या मनस्थितीत नव्हता. त्यामुळे त्याला घरात बंद करुन बाहेरुन कडी लावून घेण्यात आली.

दरम्यान निलेश मागच्या दाराने बाहेर आला. त्याने वडील आनंदा पाटील (55) यांना चाकूने भोसकून ठार केले. आपल्या वडीलांवर झालेला हल्ला बघून त्यांचा मुलगा व निलेशचा भाऊ महेंद्र तेथे धावत आला. संतापाच्या भरात निलेशने महेंद्र यास देखील चाकूच्या घावात ठार केले.

या प्रकरणी पहुर पोलिस स्टेशनला मयत आनंदा पाटील यांची पत्नी अश्विनी पाटील हिने दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्हा भाग 5 गु.र.न. 201/20 भा.द.वि.302 अन्वये दाखल झाला आहे. पुढील तपास स.पो.नि राकेशसिंग परदेशी व त्यांचे सहकारी शशी पाटील करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment