पाच लाखांच्या नोटा गायब?

नाशिक : नाशिक येथे असलेल्या करन्सी नोट प्रेसमधून पाच लाख रुपयांच्या चलनी नोटा गायब झाल्या असल्याचा गंभीर प्रकार उघड झाला असल्याचे म्हटले जात आहे. 500 रुपयांच्या नोटांचे दहा बंडल गायब झाले असल्याची माहिती पुढे येत असून अद्याप याप्रकरणी गुन्हा दाखल झालेला नाही असे देखील समजते.

नाशिक येथील करन्सी नोट प्रेस मधे कडेकोट बंदोबस्त असतो. असे असतांना देखील पाच लाख रुपये गेले कुठे? हा प्रश्न या निमीत्ताने समोर आला आहे. या नोटा गायब होण्यामागे एखादा घातपात अथवा घोटाळा तर नाही अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

या गंभीर प्रकाराची गुप्त चौकशी सुरु आहे. अंतर्गत तपास करुन देखील पाच लाख रुपयांच्या नोटांचा तपास अद्याप लागला नसल्याचे म्हटले जात आहे. नोटांची छपाई सुरु असतांनाच हा प्रकार झाला असल्याचे म्हटले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here