जळगावात कुंटणखान्यावर छापा – दोघे अटकेत

On: July 14, 2021 1:24 PM

जळगाव : जळगाव शहराच्या पिंप्राळा उपनगरातील हुडको रस्त्यावरील एका कुंटणखान्यावर रामानंद नगर पोलिसांच्या पथकाने काल रात्री छापा घातला. या छाप्यात दोघा जणांना अटक करण्यात आली आहे. दयावान बैरागी व जयेश अग्रवाल अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.

पिंप्राळा हद्दीत असलेल्या हुडको रस्त्यावर महादेव मंदीराजवळ कुंटणखाना सुरु असल्याची गुप्त माहिती पो.नि.अनिल बडगुजर यांना समजली होती. पो.नि.अनिल बडगुजर यांच्या निर्देशाखाली सुरुवातीला ठरलेल्या रकमेसह पंटर ग्राहक कुंटणखान्यावर रवाना करण्यात आला. पंटर ग्राहकाने काम फत्ते झाल्याची माहिती पोलिस निरीक्षक अनिल बडगुजर यांना फोनवर देताच दबा धरुन बसलेल्या पोलिस पथकाने धाड टाकली.

जयेश अग्रवाल (चोपडा) हा दलाल असल्याचे उघड झाले आहे. तसेच कुंटणखाना दयावान बैरागी व त्याची बहिण असे दोघे भाऊ बहिण कुंटणखाना चालवत असल्याचे आढळून आले आहे. याप्रकरणी रामानंद नगर पोलिस स्टेशनला स.पो.नि.संदीप परदेशी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार कलम 3, 4, 5, 7(1)(ब) अनैतिक व्यापार प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरु आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment