जळगाव : काल रात्री साडे सात वाजेच्या सुमारास जळगाव येथील पिंप्राळा परिसरातील हुडको रस्त्यावरील कुंटणखान्यावर पोलिसांनी छापा टाकला. या छाप्यादरम्यान कुंटनखाना चालवणारी छाया बैरागी फरार असून पोलिस पथक तिच्या मागावर आहेत. कुंटणखाना चालवण्याकामी मदत करणारा तिचा भाऊ दयावान बैरागी व दलाल जयेश अग्रवाल या दोघांना दोन दिवसांची पोलिस कोठडी न्यायालयाने सुनावली आहे..
या घटनेतील पिडीत महिलेची महिला सुधारगृहात 20 जुलै पर्यंत रवानगी करण्यात आली आहे. या घटनेतील 26 वर्ष वयाची पिडीत महिला ही मुळची पश्चिम बंगाल येथील रहिवासी आहे. दलाल जयेश अग्रवाल व दयावान बैरागी यांनी तिला काही दिवसांपुर्वी तिला नायगाव जिल्हा ठाणे येथून आणले होते. हा व्यवसाय चालवण्यासाठी ग्राहक आणण्याचे काम दलाल जयेश अग्रवाल करत होता. दरम्यान या घटनेने जळगाव हुडको परिसरात खळबळ माजली आहे.