दरोड्यासह लुटमार – अमरावती ग्रामीण एलसीबीने जेरबंद केली टोळी

अमरावती : शस्त्राचा धाक दाखवत भर दिवसा दरोडा टाकत लुटमार करणा-या टोळीचा अमरावती ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पर्दाफाश केला आहे. अवघ्या चोवीस तासात या गुन्ह्याचा तपास लावण्यात अमरावती ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे.

14 जुलै रोजी मोर्शी पोलिस स्टेशन हद्दीतील अमरावती रस्त्यावरील तळणी फाटा परिसरात काही लुटारुंनी एक मालवाहू ट्रक अडवला होता. या घटनेत फिर्यादी क्लिनरसह ट्रक चालकास ट्रकच्या खाली ओढत त्यांना मारहाण करण्यात आली होती. या टोळीने फिर्यादीसह ट्रक चालकाकडून जबरीने 3 लाख 60 हजार 725 रुपयांची रक्कम लुटून नेली होती. याप्रकरणी मोर्शी पोलिस स्टेशनला गु.र.न. 502/21 भा.द.वि. 394, 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

अमरावती ग्रामीण पोलिस अधिक्षक डॉ. हरी बालाजी, अप्पर पोलीस अधीक्षक शाम घुगे यांच्या निर्देशाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. तपन कोल्हे यांच्यासह पथकाकडून तपास सुरु होता. तपासादरम्यान पो.नि. तपन कोल्हे यांना माहिती मिळाली की राजा उर्फ नावेद रा.गुलीस्ता नगर हा त्याची आर्थिक परिस्थिती नसतांना देखील पैशांची उधळपट्टी करत आहे. तसेच तो कुठेतरी पळून जाण्याच्या बेतात आहे. तो त्याच्या एका साथीदारासह अमरावती शहरातील वेलकम पॉईंट जवळ पैशांच्या बॅगेसह उभा असल्याचे समजताच त्याला एलसीबी पथकाने शिताफीने ताब्यात घेण्यात आले.

दोघा जणांना शिताफीने ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याजवळ एवढी रक्कम कशी व कुठून आली याबाबत त्यांना कुशलतेने विचारपूस करण्यात आली. सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देणा-या दोघांनी पोलिसी खाक्या बघताच आपला गुन्हा कबुल केला. राजा उर्फ नावेद व त्याच्या साथीदारांनी मिळून मोर्शी येथे एक ट्रक अडवून लुटमार केली होती. या लुटमारीत ट्रक ड्रायव्हर व क्लीनरला मारहाण करुन त्यांचेकडील 3 लाख 60 हजार 725 रुपये जबरीने लुटण्यात आले होते. राजा व त्याचा साथीदार पुणे येथे पळून जात असतांना एलसीबी पथकाने दोघांना शिताफीने ताब्यात घेत गुन्हा उघडकीस आणला. राजाचे सर्व साथीदार अमरावती येथीलच असल्याचे त्याने सांगितले. त्यामुळे फरार आरोपींचा शोध घेत त्यांना ताब्यात घेत अटक करण्यात आली. त्यांनी देखील आपल्या गुन्ह्याची कबुली दिली.

राजा ऊर्फ नावेद खान नियामत खान (24) , रिजु उर्फ सैयद रिजवान गैसुद्दीन (27) रा.हबिब नगर, अमरावती, नावेद तेजा ऊर्फ नवेद अर्शद अब्दुल रशिद (23) रा. गुलिस्ता नगर अमरावती, पप्पु उर्फ शेख निसार शेख इब्राहीम (32) रा.गुलिस्ता नगर अमरावती, गोलु उर्फ गुलाम आरिफ गुलाम दस्तगिर (21 रा.गुलिस्ता नगर अमरावती, मोहमद जुनेद अब्दुल रशिद (30) रा. अकबर नगर अमरावती अशा सर्वांना मुद्देमालासह अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरु आहे.

पोलीस अधीक्षक डॉ.हरी बालाजी एन, अप्पर पोलीस अधीक्षक शाम घुगे, श्रीमती कविता फडतरे, उपविभागीय पोलीस अधिकारी मोर्शी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक तपन कोल्हे व पो.स्टे.मोर्शी येथील ठाणेदार सोळंके यांच्या नेतृत्वात स्थागुशाचे पो.उ.नि. सुरज सुसतकर, आशिष चौधरी, तस्लीम शेख सपोउपनि मुलचंद मुलचंद भांबुरकर, संतोष मुंदाने, पोहेकॉ दिपक उईके, नापोकॉ सचिन मिश्रा, शकील चव्हाण, दिपक सोनाळेकर, युवराज मानमोठे, अमित वानखडे, चेतन दुबे, स्वप्नील तंवर, निलेश डांगोरे,रविंद्र बावणे,पुरुषोत्तम यादव,संतोष तेलंग,मंगेश लकडे,बळवंत दाभणे, अक्षय हरणे,सागर धापड चालक तेलगोटे,मानकर, शिरसाठ व पो.स्टे.मोशीचे पोउपनि सचिन भोंडे सपोउपनि राजू मडावी, नापोकॉ संदीप वानखडे, विष्णु पवार आदींनी तपासात सहभाग घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here