घरफोडी करणारा मोटार सायकल चोरटा अटकेत

On: July 17, 2021 10:16 AM

जळगाव : घरफोडीसह मोटार सायकलच्या चो-या करणारा अट्टल गुन्हेगार जळगाव एलसीबी पथकाने अटक केला असून पुढील तपासकामी त्याला चोपडा शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. शांताराम उर्फ शान्या प्रताप कोळी (36) रा.पाडसे, ता.अमळनेर हल्ली मुक्काम माचला. तालुका चोपडा असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. त्याला चोपडा तालुक्यातील माचला येथून ताब्यात घेण्यात आले आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे पो. नि. किरणकुमार बकाले यांच्या पथकाने शांताराम कोळी यास ताब्यात घेतले असता त्याने चोपडा शहर पोलिस स्टेशन हद्दीत मोटार सायकल चोरीची कबुली दिली आहे. याशिवाय त्याने अमळनेर व चोपडा तालुक्यात दारु व किराणा दुकानात घरफोडी व चोरी केल्याचे कबुल केले.

त्याच्यावर अडावद, अमळनेर, चोपडा ग्रामीण अशा विविध पोलिस स्टेशनला चोरी, घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. ते गुन्हे त्याने कबुल केले असून उघडकीस आले आहेत. या गुन्ह्याच्या तपासकामी पो.नि. किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ. अनिल जाधव, अश्रफ शेख, इंद्रीस पठाण, दिपक शिंदे,,अशोक पाटील आदींनी तपासकामात सहभाग घेतला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment