मालकाच्या मुलीवरच जडले कामगाराचे प्रेम !- दोघांना ठार करुन संपवली त्याने रागाची फ्रेम!!

On: July 17, 2021 3:56 PM

पुणे : मालकाच्या मुलीवर कामगाराचे प्रेम जडल्यामुळे चिडलेल्या मालकाने मुलीच्या प्रियकरासह त्याच्या साथीदाराचा खून केल्याची घटना पुणे नजीक चाकणमधील करंजविहीरे गावात घडली. या दुहेरी हत्याकांडात लाकडी दांडके, लोखंडी रॉड यांचा वापर करण्यात आला. या मारहाणीत प्रियकर व त्यचा साथीदार या दोघांचा मृत्यू व प्रेयसी जखमी झाली आहे. या घटनेप्रकरणी मुलीच्या वडिलांसह सहा जणांना चाकण पोलिसांनी अटक केली आहे.

मयत, बाळू सीताराम गावडे व राहुल गावडे हे दोघे मित्र होते. दोघे मित्र वीटभट्टीवर कामाला होते. विटभट्टी मालकाच्या मुलीसोबत बाळू गावडे याचे प्रेम जमले होते. दोघांच्या लग्नाला घरातून विरोध होणार हे निश्चीत असल्यामुळे दोघांनी पळून जाण्याचे ठरवले होते. दोघांना पळून जाण्याकामी राहुल गावडे याने मदत केली. आपल्या मुलीला 14 जुलै रोजी बाळूसोबत पळून जाण्याकामी राहुलने मदत केल्याचे विट भट्टी मालकाच्या लक्षात आले.

विट भट्टी मालकाची हॉटेल देखील आहे. त्याने बाळू व राहुलसह त्याच्या मुलीला शोधून काढले. त्याने तिघांना हॉटेलवर पकडून आणत बेदम मारहाण केली. या मारहाणीत दोघा मित्रांचा मृत्यू झाला तर मुलगी जखमी झाली. या मारहाणीत लाकडी दांडके, लोखंडी रॉड यांचा वापर करण्यात आला. पोलिसांनी मुलीच्या वडिलांसह सहा जणांना ताब्यात घेतले आहे. पुढील तपास चाकण पोलीस करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment