जळगाव : घर बंद असल्याचे बघून टाईल्स बसवणा-या राजस्थानी कारागीराच्या घरातून रोख रकमेसह सोन्याच्या दागिन्यांची चोरी झाल्याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात रितसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जळगाव शहरातील रामेश्वर कॉलनी परिसरातील विश्वकर्मा नगरात हा चोरीचा प्रकार उघडकीस आला आहे.
रामप्रताप किसनराम सैनी हे टाईल्स बसवण्याचे काम करतात. 1 जुलै ते 17 जुलै दरम्यान त्यांचे घर बंद असल्याचे बघून चोरट्यांनी त्यांच्या घराच्या दरवाज्याचा कडीकोंडा तोडून रोख रक्कम व सोन्याचे दागिनेअसा एकुण 70 हजार रुपयांचा ऐवज चोरी केला आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे.