जेष्ठ नागरिकाची रक्कम गायब करणाऱ्या चोरट्याला पब्लिक मार

On: July 19, 2021 8:36 PM

जळगाव : पेन, डायरी मागण्याच्या निमीत्ताने जेष्ठ नागरिकाच्या खिशातील साडेतीन हजार रुपये गायब करणा-या चोरट्याला वृद्धाच्या पत्नीने काठीने झोडपून काढण्याची घटना आज अमळनेर बस स्थानकात घडली. दुपारी तिन वाजेच्या सुमारास घडलेल्या या प्रसंगाची अनेकांनी व्हिडीओ क्लिप काढून व्हायरल केली. पब्लिकने देखील चोरट्यास चोप देत आपला हात आणि राग साफ करुन घेतला.

अमळनेर तालुक्यातील वावडे येथील हिंमत पाटील हे जेष्ठ नागरिक आपल्या पत्नीसह अमळनेर येथे बाजार करण्यासाठी आले होते. बस स्थानकात एका चोरट्याने त्यांना पेन मागितला. आपल्याकडे पेन नसल्याचे त्यांनी चोरट्याला सांगितले. पेन नसल्याचे कळताच चोरट्याने त्यांना डायरी मागीतली. दरम्यान चोरट्याने हिंमत पाटील यांच्याजवळ असलेले साडेतीन हजार रुपये घेत पोबारा करण्याचा प्रयत्न केला.

आपली रक्कम हिसकावत पळ काढणा-या चोरट्याच्या दिशेने आरडाओरड करण्यास हिंमत पाटील यांनी सुरुवात केली. त्यांच्या ओरडण्याचा आवाज ऐकून नागरिकांनी चोरट्याला कन्या शाळेनजीक ताब्यात घेत चोप देण्यास सुरुवात केली. तेथे पोहोचलेल्या हिंमत पाटील यांच्या वृद्ध पत्नीने त्याला काठीने मार देण्यास सुरुवात केली. अखेर चोरट्याने साडेतीन हजार रुपये परत दिल्याने काही वेळाने शांतता झाली.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment