नाशिक : इगतपुरी येथील रेव्ह पार्टीत सहभाग असलेली अभिनेत्री हिना पांचाल हिची सशर्त जामीनावर मुक्तता करण्यात आली आहे. रेव्ह पार्टीत ड्रग्जचा समावेश असल्या प्रकरणी इतरांसह तिला देखील अटक करण्यात आली होती.

सिने अभिनेत्री हिना पांचालसह 22 संशयितांचा नाशिक जिल्हा – सत्र न्यायालयाकडून सशर्त जामीन मंजूर करण्यात आला आहे. मुंबई येथील नायजेरियन व्यक्तीकडून ड्रग्ज आणणाऱ्या हर्ष ऊर्फ बॉब शैलेश शहा व रेव्ह पार्टीचे आयोजन करणा-या पीयूष भोगीलाल क्षेटिया यांचा जामीन मात्र फेटाळण्यात आला आहे.
इगतपुरी येथील स्काय ताज व्हिला या आलीशान बंगल्यातील रेव्ह पार्टीवर नाशिक ग्रामीण पोलिस अधिक्षक सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली छापा टाकण्यात आला होता. या छाप्यात सिने अभिनेत्री हिना पांचाल, परदेशी महिला, फिल्म कोरिओग्राफरसह पार्टीचे आयोजक तसेच नायजेरियन नागरिकासह एकुण 22 संशयित अटक करण्यात आले होते. या कारवाईने मोठी खळबळ उडाली होती.