जळगाव : भुसावळ बाजारपेठ पोलिस स्टेशनला दाखल खंडणीच्या गुन्ह्यातील फरार आरोपी अमोल काशीनाथ राणे (रा. निवृत्ती नगर भुसावळ ) याला श्रीराम नगर परिसरातून ताब्यात घेत अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी 18 जुलै रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पो.नि.दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ना.रविंद्र बि-हाडे, रमण सुरळकर, उमाकांत पाटील, पो. कॉ. विकास सातदिवे, प्रशांत परदेशी, ईश्वर भालेराव, श्रीकृष्णा देशमुख, योगेश माळी, परेश बि-हाडे, जिवन कापडे आदींनी या कारवाईत सहभाग घेतला. पुढील तपास स.पो नि. अनिल मोरे व पो. ना. समाधान पाटील करत आहेत.