जळगाव : जिल्ह्यातील सर्व सोळा वर्षांच्या खालील क्रिकेट खेळाडूंना सूचित करण्यात येते की आंतर जिल्हा क्रिकेट स्पर्धेसाठी जळगाव जिल्हा क्रिकेट संघाच्या निवड चाचणीचे आयोजन करण्यात आला आहे. जे क्रिकेट खेळाडूं 1 सष्टेंबर 2005 रोजी किंवा त्यानंतर जन्मलेले असतील त्यांनी शनिवार दि. 24 जुलै 2021 रोजी सकाळी आठ वाजता उपास्थित रहावे. जळगाव जिल्हातील जास्तीत जास्त क्रिकेट खेळाडूंनी आपला सहभाग यात नोंदवावा. निवड चाचणी जैन स्पोर्ट्स अकॅडमीच्या ( विद्या इंग्लिश स्कूल मागील ) मैदानावर घेण्यात येईल. सर्व खेळाडूंनी क्रिकेटच्या पांढऱ्या गणवेशात हजर रहावे. या निवड चाचणीसाठी ऑनलाईन नोंदणी आवश्यक आहे त्याची लिंक पुढीलप्रमाणे आहे. https://forms.gle/u1SKzBHoxaBxaedMA
https://forms.gle/u1SKzBHoxaBxaedMA

अधिक माहितीसाठी अरविंद देशपांडे (9422278936) व मोहम्मद फजल (9834197070) यांचेशी संपर्क साधण्याचे आवाहन जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अतुल जैन यांनी केले आहे.








