पाचोरा : मध्यमवर्गीय विद्यार्थ्यास त्याचा हरवलेला मोबाईल कॉंग्रेस सोशल मिडीया पदाधिका-याच्या मदतीने परत मिळाला. आपला हरवलेला मोबाईल परत मिळाल्याने विद्यार्थ्याचा आनंद गगनात मावत नव्हता.
पाचोरा शहरातील नवकार प्लाझा – साई पार्क परिसरातील रहिवासी असलेल्या दिनेश देविदास जाधव या शालेय विद्यार्थ्याचा मोबाईल हरवला होता. त्याचा हरवलेला मोबाईल कॉंग्रेसचे सोशल मीडिया विधानसभा अध्यक्ष राहुल शिंदे यांना सापडला. त्यांनी तो मोबाईल कॉंग्रेसचे पाचोरा तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांच्याकडे दिला. ज्या कुणाचा हा मोबाईल असेल त्याला तो मिळाला पाहिजे अशी आर्जव राहुल शिंदे यांनी सचिन सोमवंशी यांना केली.
मोबाईल हरवलेल्या विद्यार्थ्यास कॉंग्रेस कार्यालयात बोलावून त्याच्या हवाली करण्यात आला. यावेळी हरवलेला मोबाईल सापडल्याने दिनेश जाधव हा विद्यार्थी भारावून गेला. मोबाईल नसल्यामुळे त्याचे ऑन लाईन शिक्षणाचे होणार नुकसान टळले. नवीन मोबाईल घेण्यासाठी आर्थिक संकट विद्यार्थ्यापुढे उभे राहिले होते. अशा वेळी कॉंग्रेसचे पदाधिकारी धावून आले होते. यावेळी कॉंग्रेसचे पाचोरा तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी, सोशल मिडीया विधानसभा अध्यक्ष राहुल शिंदे, पत्रकार किशोर रायसाकडा आदी उपस्थित होते.