मुंबई : प्रसिद्ध सिनेअभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचा पती राज कुंद्रा याच्या कमाईची आकडेवारी समोर आली आहे. दर दिवसाला त्याची कमाई लाखो रुपयांच्या घरात होती. राज कुंद्रा सध्या पोलिस कोठडीत आहे. राज कुंद्रा याच्या आयटी हेडचा तज्ञ रायन थॉर्प याला नेरुळ येथून पोलिसांनी ताब्यात घेत अटक केली आहे. एकुण अकरा जण सध्या पोलिसांच्या कोठडीत आहेत.

या टोळीचा मुख्य सुत्रधार राज कुंद्रा असून फेब्रुवारीत अटक करण्यात आलेल्या उमेश कामतच्या चौकशी दरम्यान हे प्रकरण उघडकीस आले. उमेश कामत हा राज कुंद्रा याच्या विआन इंडस्ट्रियल इस्टेट कंपनीचा मॅनेजिंग डायरेक्टर आहे. कामतने दिलेल्या माहितीनुसार लंडन येथील रहिवासी असलेल्या केनरिन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे मालक प्रदीप बक्षी हे कुंद्राचे नातेवाईक आहेत.
हॉटशॉट डिजीटल प्लॅटफॉर्मवर पॉर्न सिनेमा रिलीज केल्यानंतर राज कुंद्रा यास लाखो रुपयांची कमाई होत असे. हॉटशॉटकडून राज कुंद्रा आणि त्याच्या कंपनी खात्यात लाखो रुपये वर्ग केले जात होते. 22 डिसेंबर 2020 ते 3 फेब्रुवारी 2021 दरम्यान रक्कम वळती झाल्याचा तपशील उघड झाला आहे. बँक ट्रान्सफरचा तपशील पुढीलप्रमाणे असल्याचे उघड झाले आहे. 22 डिसेंबर 2020 रोजी XX790 खात्यात हॉटहिट खात्यातून 3 लाख रुपयांची रक्कम आली. 25 डिसेंबर 2020 रोजी XX790 खात्यात हॉटहिट खात्यातून 1 लाख रुपये वर्ग झाले. 26 डिसेंबर 2020 रोजी XX790 खात्यात हॉटहिट खात्यातून 10 लाख रुपये वर्ग झाले. 28 डिसेंबर 2020 रोजी हॉट हिट खात्यातून XX790 खात्यात 50 हजार रुपये जमा झाले.
हॉट हिट खात्यातून XX790 खात्यात 3 जानेवारी 2021 रोजी 2 लाख 5 हजार रुपये, 10 जानेवारी 2021 रोजी 3 लाख, 13 जानेवारी 2021 रोजी 2 लाख, 20 जानेवारी रोजी 1 लाख, 23 जानेवारी 2021 रोजी 95 हजार रुपये आले. 3 फेब्रुवारी 2021 रोजी 2लाख 70 हजार रुपये जमा झाले. एवढी कमाई झाल्यानंतर देखील पोर्न नायक व नायिकांना त्यांनी केलेल्या कामाचे पैसे मिळाले नसल्याचे देखील उघडकीस आले आहे. जवळपास 81 कलाकारांचे पैसे देणे बाकी असल्याचे मिळालेल्या माहितीवरुन उघड झाले आहे.
